E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावी प्रवेशासाठी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची ऑनलाइन नोंदणी सोमवारी सुरळीत सुरू झाली. पहिल्याच दिवशी राज्यभरातील २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा प्रथमच या संकेतस्थळावर स्मार्टफोन दुरुस्तीपासून फॅशन डिझाइनिंगपर्यंतच्या दीडशेहून अधिक करिअरक्षेत्रांची माहिती शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १९ मेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडल्याने शिक्षण विभागावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची वेळ आली. नोंदणी संकेतस्थळाला आलेल्या अडचणी दूर करून सोमवारपासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. प्रवेश प्रक्रिया सोमवारी सुरळीत सुरू झाल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
राज्यभरात यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यात ९ हजार ३३७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २० लाख ८८ हजार २९० जागा उपलब्ध आहेत. त्यातील २ लाख १३ हजार ३५५ जागा राखीव कोट्यांतर्गत, तर १८ लाख ७४ हजार ९३५ जागा केंद्रीयभू प्रवेशांसाठी आहेत.
शिक्षण विभागाने यंदा अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी विविध करिअर क्षेत्रांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यात स्मार्टफोन दुरुस्ती, फॅशन डिझायनिंग, चित्रपट, विपणन, कॅलिग्राफी, रेडिओ जॉकी, कंपनी सचिव, भारतीय प्रशासकीय सेवा अशा एकूण १५० हून अधिक क्षेत्रांचा समावेश आहे.
करिअर क्षेत्रे, विविध अभ्यासक्रमांची पात्रता, कामाचे स्वरूप याबाबतची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, म्हणून करिअर क्षेत्रांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसमावेशक पद्धतीने सर्व शाखांतील करिअरसंधी देण्यात आल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या करिअरचा विचार करू शकतील, अशी माहितती डॉ. महेश पालकर यांनी दिली.
Related
Articles
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट